मध्य रेल्वे मार्गावर मार्च महिन्याच्या अखेरीस धावणार २ एसी लोकल?

पश्चिम रेल्वे मार्गानंतर आता मध्य रेल्वेवर एसी लोकल धावणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावर एकूण ६ एसी लोकल धावणार आहेत. यापैकी २ एसी लोकल मार्च महिन्यात सुरू होणार आहेत. त्यामुळं आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

एकूण १२ लोकल

मुंबईत एकूण १२ एसी लोकल दाखल होणार आहेत. या १२ लोकलपैकी मध्य रेल्वेवर दुसरी, तिसरी, सातवी, आठवी, अकरावी आणि बारावी एसी लोकल दाखल होणार आहे. तसंच, पश्चिम रेल्वेवर पहिली, चौथी, पाचवी, सहावी, नववी आणि दहावी लोकल दाखल होणार आहे. अशा दोन्ही मार्गवार प्रत्येकी ६ लोकल धावणार आहेत.

कुठल्या मार्गावर धावणार?

रेल्वे प्रशासनाने एकूण १२ एसी लोकल आणण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार, मार्च महिन्याच्या अखेरीस मध्य रेल्वे मार्गावर १२ डब्यांच्या २ एसी लोकल धावणार आहेत. मात्र, नेमक्या कोणत्या मार्गावर धावणार याबाबत माहिती मिळालेली नसून त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे.


हेही वाचा-

शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवासी घेताहेत वाचनाची ‘अनुभूती’

एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरक एकरकमी मिळणार


पुढील बातमी
इतर बातम्या