Advertisement

एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरक एकरकमी मिळणार

राज्यातील एसटी महामंडळाच्या सुमारे १३ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार अाहे. त्यांना अंदाजे २४० कोटी रुपयांची फरकाची रक्कम एकरकमी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरक एकरकमी मिळणार
SHARES

एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. महामंडळाच्या १ एप्रिल २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरकाची रक्कम हप्त्यामध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णय परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला आहे.


१३ हजार कर्मचाऱ्यांना लाभ

 राज्यातील एसटी महामंडळाच्या सुमारे १३ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार अाहे. त्यांना अंदाजे २४० कोटी रुपयांची फरकाची रक्कम एकरकमी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसंच, यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही उर्वरीत फरकाची रक्कम एकरकमी देण्यात येणार आहे. 


जून २०१८ मध्ये वेतनवाढ 

बुधवारी सह्याद्री राज्य अतिथीगृहात महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, एसटीचे महाव्यवस्थापक माधव काळे, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी अशोक फळणीकर हे या बैठकीला उपस्थित होते. मंत्री रावते यांनी जून २०१८ मध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४ हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केली होती.


तातडीने अंमलबजावणी

या वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे १ एप्रिल२०१६ पासून देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. एप्रिल २०१६ ते जून २०१८ या दरम्यानच्या काळातील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना हप्त्यामध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही फरकाची रक्कम हप्त्यांमध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचना मंत्री दिवाकर रावते यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.



हेही वाचा - 

मालगाडीच्या इंजिनात बिघाड, मरेची वाहतूक विस्कळीत

वडाळा ते जेकब सर्कल मोनो मार्गाची प्रतीक्षा २०१९ मध्ये तरी संपणार का?




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा