Advertisement

वडाळा ते जेकब सर्कल मोनो मार्गाची प्रतीक्षा २०१९ मध्ये तरी संपणार का?

गेल्या ८ वर्षांपासून प्रतिक्षेत असलेला हा प्रकल्प २०१९ मध्ये तरी पूर्ण होणार का? याकडेच मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी लवकरच हा टप्पा सुरू होईल असं 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं आहे. मात्र लवकर म्हणजे नेमकं कधी? याचं उत्तर देणं त्यांनी टाळलं.

वडाळा ते जेकब सर्कल मोनो मार्गाची प्रतीक्षा २०१९ मध्ये तरी संपणार का?
SHARES

चेंबूर-जेकब सर्कल मोनोरेल प्रकल्पातील वडाळा ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पा कधी सुरू होणार हा मोठा प्रश्न २०११ पासून आतापर्यंत मुंबईकरांसमोर उभा आहे. ११.२८ किमीच्या या दुसऱ्या टप्प्याचं काम मे २०११ मध्ये पूर्ण होऊन हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणं अपेक्षित होतं. मात्र जानेवारी २०१९ उजाडला तरी हा टप्पा अद्याप सुरू झालेला नाही.


नेमकं कधी?

गेल्या ८ वर्षांपासून प्रतिक्षेत असलेला हा प्रकल्प २०१९ मध्ये तरी पूर्ण होणार का? याकडेच मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी लवकरच हा टप्पा सुरू होईल असं 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं आहे. मात्र लवकर म्हणजे नेमकं कधी? याचं उत्तर देणं त्यांनी टाळलं.


९ प्रकल्प गुंडाळले

मुंबईच्या ज्या भागात रेल्वे, बेस्ट अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पोहचू शकत नाही तिथं नवा पर्याय म्हणून 'एमएमआरडीए'नं मोनोचा पर्याय आणला. पण पहिल्या मोनो मार्गाला मिळालेला प्रतिसाद पाहता ९ मोनोमार्ग 'एमएमआरडीए'ने गुंडाळले. त्यामुळे मुंबईत चेंबूर ते जेकब सर्कल हा पहिला आणि एकमेव मोनो मार्ग असणार आहे. मोनोरेल प्रकल्पानुसार चेंबूर ते जेकब सर्कल मोनोमार्गातील चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा २०१० मध्ये तर वडाळा ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पा मे २०११ मध्ये सेवेत दाखल होणं अपेक्षित होतं.


'एमएमआरीडए'कडे ताबा

मोनोचं संथगतीनं सुरू असलेलं काम आणि कामातील तांत्रिक अडचणी लक्षात घेता चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा सुरू होण्यास २०१० ऐवजी २०१४ उजाडलं. तर चेंबूर ते जेकब सर्कलचा दुसरा टप्पा जानेवारी २०१९ उजाडले तरी सुरू झालेला नाही. या टप्प्याचं बांधकामाचं काम १०० टक्के पूर्ण झालं असून या मार्गाच्या चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. मात्र तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प रखडल्याचं राजीव यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे चेंबूर ते जेकब सर्कल या संपूर्ण मोनोमार्गाचा ताबा 'एमएमआरीडए'नं स्वत: कडे घेतला आहे. मोनोच्या व्यवस्थापनासह देखभालीची जबाबदारीही आता 'एमएमआरीडए'कडे आहे. त्यामुळे आता 'एमएमआरीडए'ने दुसरा टप्पा शक्य तितक्या लवकर सुरू करण्याकडे भर दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


५ गाड्या मागवल्या

दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी नव्या गाड्यांची गरज आहे. त्यानुसार नव्या ५ गाड्या मागवण्यात आल्या असून त्या शक्य तितक्या लवकरच मुंबईत दाखल करण्यासाठी 'एमएमआरीडए' प्रयत्नशील आहे. तर सध्या पहिल्या मार्गावरील १० गाड्यांपैकी ५ गाड्या नादुरूस्त झाल्या आहेत. त्या गाड्यांच्या दुरूस्तीसाठी नुकतंच 'एमएमआरीडए'नं निविदा काढल्या आहेत. या निविदा लवकरच अंतिम करत गाड्या दुरूस्त करून घेतल्या जाणार आहेत. एकूणच गाड्या दुरूस्त झाल्याबरोबर दुसरा टप्पा सुरू करू. त्यातही नव्या गाड्या आल्यास दुसऱ्या टप्प्यावरील फेऱ्या वाढवू, असंही राजीव यांनी सांगितलं आहे. नेमकी डेडलाईन देण्यास मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.


डेडलाईन देण्यास नकार

आतापर्यंत मोनोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिकृत अशा १५ डेडलाईन 'एमएमआरीडए'कडून देण्यात आल्या होत्या. मे २०११ पासून मे २०१७ पर्यंत या डेडलाईन दिल्या गेल्या आहेत. मात्र या डेडलाईननंतरही मोनो काही सुरू होत नसल्यानं 'एमएमआरीडए'वर मोठी टीका होत होती. या टीकेनंतर 'एमएमआरीडए'नं कानाला खडा लावत डेडलाईन देणंच बंद केलं आहे. दरम्यान २ फेब्रुवारी २०१९ ला दुसरा टप्पा सुरू होईल अशी चर्चा आहे. त्यामुळे २ फेब्रुवारी मोनोचा दुसरा टप्पा सुरू होतो का? हे आता लवकरच स्पष्ट होईल.हेही वाचा-

अरेरे! मोनोचे प्रवासी ५ हजारांनी घटले!!

एमएमआरडीए, स्कोमीमधील वाद न्यायालयाच्या दारातसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा