Advertisement

अरेरे! मोनोचे प्रवासी ५ हजारांनी घटले!!

तब्बल ९ महिन्यानंतर ट्रॅकवर आलेल्या मोनोची प्रवासी संख्या घटली आहे. याआधी प्रति दिन १५ हजार असलेली प्रवासी संख्या आता प्रति दिन १० हजारांवर आली आहे.

अरेरे! मोनोचे प्रवासी ५ हजारांनी घटले!!
SHARES

चेंबूर ते वडाळा दरम्यान धावणारी देशातील पहिली-वहिली मोनोरेल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) साठी पांढरा हत्ती ठरत आहे. कारण तब्बल ९ महिन्यानंतर देखभाल-व्यवस्थापानासाठी अधिक खर्च देऊन ट्रॅकवर आणलेल्या मोनोची प्रवासी संख्या घटली आहे. याआधी प्रति दिन १५ हजार असलेली प्रवासी संख्या आता प्रति दिन १० हजारांवर आली आहे. एकीकडे खर्चात भरमसाठ वाढ झालेली असताना प्रवाशी संख्या कमी झाल्याने 'एमएमआरडीए'च्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.


६ ते ८ लाखांचा तोटा

चेंबूर ते वडाळा मार्गावरील प्रवाशांची संख्या सुरूवातीपासूनच कमी आहे. त्यामुळं या 'फ्लाॅप' ठरलेल्या मार्गावर 'एमएमआरडीए'ला दिवसाला ६ ते ८ लाख रुपये तोटा सहन करावा लागत होता. त्यातच ९ महिन्यांपूर्वी मोनोच्या डब्याला आग लागली नि मोनो एक-दोन महिने नव्हे, तर तब्बल नऊ महिने ठप्प झाली. त्याचा वेगळा फटका 'एमएमआरडीए'ला बसला.


अार्थिक भार वाढला

आगीच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक त्या चाचण्या करत ९ महिन्यानंतर मोनो पुन्हा सेवेत दाखल करण्याचा निर्णय 'एमएमआरडीए'ने घेतला. पण मोनोच्या व्यवस्थापन-देखभालीची जबाबदारी असणाऱ्या एल अॅण्ड टी-स्कोमी कंपनीने व्यवस्थापन-देखभाल खर्चात वाढ मागितली. त्यानुसार ४६०० रू. प्रति. ट्रिपसाठीचे शुल्क आता १०६०० रु. प्रति. ट्रिप असे करण्यात आले आहेत. त्यामुळे साहजिकच 'एमएमआरडीए'वरील आर्थिक भार दुप्पटीहून अधिक वाढला आहे.


प्रवासी संख्या 'अशी'

एवढा आर्थिक भार उचलल्यानंतर मोनोची प्रवासी संख्या आहे तितकी राहणं तर सोडाच; पण मोठ्या प्रमाणावर घटली आहे. नोव्हेंबर २०१७ पर्यंत मोनोने जिथं प्रति दिन १५ हजार प्रवासी प्रवास करत होते तिथं १ सप्टेंबरपासून ट्रॅकवर आलेल्या मोनोची प्रवासी संख्या प्रति दिन १० हजार एवढी झाली आहे.


'हा' मार्ग मिळवून देईल फायदा

याविषयी 'एमएमआरडीए'चे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांना विचारलं असता त्यांनी प्रवासी संख्या ५ हजाराने कमी झाल्याची कबुली दिली आहे. मात्र त्याचवेळी ही संख्या वाढेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. चेंबूर ते जेकब सर्कल (संत गाडगे महाराज चौक) असा संपूर्ण मोनो मार्ग सुरू झाल्यानंतर मोनोला प्रचंड प्रतिसाद मिळेल नि मोनो फायद्यात येईल, असा विश्वासही त्यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना व्यक्त केला आहे.हेही वाचा-

वारंवार मोनो का बंद पडते? एमएमआरडीए करणार चौकशी

मोनोरेल 'एमएमआरडीए'साठी ठरणार पांढरा हत्ती!Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा