Advertisement

वारंवार मोनो का बंद पडते? एमएमआरडीए करणार चौकशी


वारंवार मोनो का बंद पडते? एमएमआरडीए करणार चौकशी
SHARES

देशातील पहिली 'मोनोरेल' अशी ओळख असलेल्या मुंबईतील चेंबूर-जेकब सर्कल मोनोरेल प्रकल्पातील अडचणी काही संपताना दिसत नाहीत. आगीच्या प्रकरणानंतर तब्बल नऊ महिन्यांनी सुरू झालेली मोनो 1 सप्टेंबरला पुन्हा धावू लागली. त्यामुळे चेंबूर, माहुल, वडाळा परिसातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. पण मोनो सुरू होऊन 48 तासही होत नाहीत तोच मोनो बंद पडली. त्यामुळे पुन्हा मोनोच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तेव्हा मोनो का बंद पडली? याचा जाब मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कंत्राटदाराला विचारणार आहे.


एमएमआरडीएला आर्थिक भुर्दंड‌

मोनो सुरू झाल्यापासून किती तरी अपघात झाले आहेत. अनेकदा प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत. ‌एमएमआरडीएसाठी मोनो पांढरा हत्ती ठरत असतानाही एमएमआरडीए हा प्रकल्प बंद पडू देत नाही. इतकेच नव्हे तर मोनोची व्यवस्थापना आणि देखभाल नीट व्हावी यासाठी आणखी आर्थिक भुर्दंड सोसत एमएमआरडीएनं 'स्कुमो-एल अँड टी' या कंत्राटदार कंपनीला दर वाढवून दिले आहेत. प्रति ट्रिप 4 हजार 600 रुपये ऐवजी प्रति ट्रिप 10 हजार 600 रुपये देत एमएमआरडीएनं आणखी आर्थिक बोजा उचलला आहे. ‌असं असताना, दर वाढवून देऊनही मोनो दुसऱ्या दिवशी बंद पडते यामुळे आता एमएमआरडीएनं प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.


लवकरच चौकशी समितीची स्थापना

याच पार्श्वभूमीवर मोनो का बंद पडली? याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. एमएमआरडीएकडून त्यासाठी लवकरच चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे सह प्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. ‌या चौकशीत कंत्राटदार कंपनी स्कुमो-एल अँड टी दोषी आढळली तर त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असंही कवठकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान 2 सप्टेंबरला रविवारी केबल वायर अडकल्यान मोनो दुपारच्या वेळेस बंद पडली होती. त्यामुळे अनेक प्रवासी मधेच अडकले होते. पण अर्धा तासानंतर पुन्हा मोनो सेवा सुरू झाली.



हेही वाचा

मोनोरेल 'एमएमआरडीए'साठी ठरणार पांढरा हत्ती!

मोनोमागचं शुक्लकाष्ठ संपेना, कंत्राटदारांची पाचपट जादा दराची मागणी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा