Advertisement

चेंबूर नाक्यावर मोनोरेल पडली बंद, प्रवासी अडकले


चेंबूर नाक्यावर मोनोरेल पडली बंद, प्रवासी अडकले
SHARES

तब्बल 9 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर सुरू झालेली मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा एकदा बंद पडली. रविवारी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चेंबूर नाका येथे केबल अडकल्याने मोनोरेल बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. यावेळी अनेक प्रवासी मोनोमध्ये अडकले.


अग्निशमन दल घटनास्थळी

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोनोरेलच्या पहिल्या टप्प्यावर आग लागल्याने मोनोरेल बंद पडली होती. ही मोनो अद्याप बंदच होती. मात्र आता तब्बल नऊ महिन्यांनंतर 1 सप्टेंबरपासून हा टप्पा सुरू झाला. मात्र रविवारी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी मोनो तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा एकदा बंद पडली. दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.  


म्हणून मोनो पडली बंद

केबल मोनोरेलच्या मार्गात आल्यानं ही मोनोरेल बंद पडल्याची माहिती समोर येते. यात काही प्रवाशी अडकले असून अजूनही मोनोरेल एकाच ठिकाणी थांबली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर मोनोची तांत्रिक बिघाड दूर झाली. मोनोरेलमध्ये छोटासा तांत्रिक बिघाड झाला होता. तो आता सोडवण्यात आला आहे, अशी माहिती एमएमआरडीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा