Advertisement

मालगाडीच्या इंजिनात बिघाड, म.रे.ची वाहतूक विस्कळीत


मालगाडीच्या इंजिनात बिघाड, म.रे.ची वाहतूक विस्कळीत
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील आसनगाव ते आटगाव स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली अाहे. गुरूवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कसाऱ्याकडं जाणाऱ्याच्या मालगाडीचं इंजिन बिघडल्याने कसाऱ्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक ठप्प झाली. 


एक्सप्रेस खोळंबल्या

दुपारच्या वेळेस प्रवासी संख्या कमी असली तरी या बिघाडामुळं लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. अासनगाव स्थानकात गोदान एक्सप्रेस, गोरखपूर एक्सप्रेस अाणि हावडा एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे. बिघाड दुरूस्त करण्यासाठी अासनगाव येथून इंजिन पाठवण्यात अालं अाहे. 


बुधवारीही विस्कळीत

नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारीही मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. एेन गर्दीच्या वेळी ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावर रेल्वे रुळाला तडे गेले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर सायन स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. परिणामी प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. 




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा