पनवेल-सीएसएमटी हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

Representative
Representative

पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मार्गावर लोकल ट्रेन रुळावरून घसरल्याने हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आहे. ही घटना सकाळी 11.43 वाजता घडली जेव्हा ट्रेन सीएसएमटी स्थानकाजवळ येत होती, तेव्हा डब्याचे एक चाक रुळावरून घसरले, असे मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिकारी रुळावरून घसरल्याच्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि परिस्थिती सुधारण्यासाठी आणि रेल्वे सेवा पुरर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या मस्जिद बंदर स्थानकापर्यंत आणल्या जातील. हार्बर मार्गावरील सेवा वडाळ्यापासून आणि वडाळ्यापर्यंत सुरू राहतील. लोकल वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे काम वेगात सुरू आहे.

मुख्य मार्गावरील सेवांवर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील लोकल सेवा काही वेळातच पूर्ववत होईल, अशी हमी रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.


हेही वाचा

दादर स्टेशन : प्लॅटफॉर्म 10वरून लवकरच दोन्ही बाजूने चढता-उतरता येणार

आता प्लॅटफॉर्मवर उभं राहूनही काढता येणार तिकिट

पुढील बातमी
इतर बातम्या