Advertisement

दादर स्टेशन : प्लॅटफॉर्म 10वरून लवकरच दोन्ही बाजूने चढता-उतरता येणार

दादर स्टेशनच्या गर्दीत लक्षणीय बदल होणार आहे.

दादर स्टेशन : प्लॅटफॉर्म 10वरून लवकरच दोन्ही बाजूने चढता-उतरता येणार
SHARES

मध्य रेल्वे (CR) ने सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 चे डाउन फास्ट लोकल गाड्यांसाठी दोन्ही बाजूंनी चढता-उतरता येणाऱ्या प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर केले आहे. त्यामुळे संध्याकाळी गर्दीच्या वेळी दादर स्टेशनच्या गर्दीत लक्षणीय बदल होणार आहे.

मुंबईतील सर्वात व्यस्त रेल्वे केंद्रांपैकी एक असे दादर स्टेशनवरील गर्दी कमी करणे आणि प्रवाशांची संख्या वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कल्याणच्या दिशेने सुमारे 150 डाऊन फास्ट लोकल आणि असंख्य लांब पल्ल्याच्या गाड्या दररोज जातात.

प्लॅटफॉर्म 9 आणि 10 वर एकाच वेळी येतात, ज्यामुळे संभाव्य चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवते. प्रवाशांना ट्रेनच्या दोन्ही बाजूंनी चढण्यास आणि उतरण्यास यामुळे मदत होईल. यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होते.

"प्लॅटफॉर्म 10/11 चे होम प्लॅटफॉर्म (दोन्ही बाजूंनी चढणे-उतरणे) मध्ये रूपांतर हे प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. सार्वजनिक वापरासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 10 उघडल्याने, प्रवाशांना दोन्ही बाजूंनी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सुव्यवस्थित होईल आणि गर्दी कमी होईल" एका अधिकाऱ्याने सांगितले.हेही वाचा

‘बेस्ट’ला झटका, तीन हजार कोटी देण्यास पालिकेचा स्पष्ट नकार

आता प्लॅटफॉर्मवर उभं राहूनही काढता येणार तिकिट

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा