सर्वसमान्यांसाठी जनता दल कार्यकर्त्यांचं विनातिकीट लोकल प्रवास आंदोलन

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी लोकल (mumbai local) प्रवास बंद करण्यात आलं आहे. लोकल प्रवास बंद असल्यानं सर्वसामान्यांना रस्ते वाहतुकीनं (road transport) प्रवास करावा लागतो. रस्ते वाहतूक ही त्रासदायक व खर्चिक असल्यानं नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहेत. शिवाय, रस्ते वाहतुकीत अधिक वेळ जात असल्यानं कामावर निश्चित वेळेत पोहोचता येत नाही. तसंच, रस्ते वाहतुक म्हटलं की लांब पल्ल्यांचा प्रवास असल्यानं नागरिकांना आपला खिशाला कात्री लावावी लागते. दरम्यान सर्वसामान्यांना होणारा हा त्रास लक्षात घेता अनेकांनी लोकल सुरू करण्याची मागणी केली आहे.

सर्वसमान्यांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यासाठी आंदोलन केली जात आहेत. अशातच आता जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या वतीनं आदोलन करण्यात आलं. विनातिकीट लोकल प्रवास असं या आंदोलाचं स्वरुप होतं. जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव रवी भिलाणे, मुंबई महासचिव ज्योती बडेकर आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनादरम्यान पक्ष प्रतिनिधींनी मुंबईच्या विविध भागांत विनातिकीट लोकल प्रवास केला. त्यानंतर पक्षाच्या वतीने चर्चगेट (churchgate) येथील पश्चिम रेल्वे (western railway) मुख्यालयात महाव्यवस्थापकांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

रेल्वे प्रशासनाने ही मागणी सरकापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती ज्योती बडेकर यांनी दिली. दरम्यान, याआधी रेल्वे प्रवासी संघटना, सामान्य नागरिक, राजकीय नेते यांनी लोकल प्रवास सुरू करण्यासाठी आंदोलनं केली आहेत. त्यामुळं आता आदोलनाला राज्य सरकारचा सकारात्म प्रतिसाद मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांप्रमाणे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार का याकडं आता सर्वांच लक्ष लागलं आहे. 


हेही वाचा -

पुढील बातमी
इतर बातम्या