केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यावर, स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित आणि स्वच्छ अशा मेट्रोसारख्या (metro) लोकल ट्रेनची (mumbai local) निर्मिती होणार आहे.
2027 ते 2030 पर्यंत मेट्रोसारख्या (mumbai metro) 238 उपनगरीय लोकल ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.
मुंबई (mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दोन पायाभूत सुविधांचे ई-लोकार्पण, ठाणे ते बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या प्रकल्पातील ठाणे बाजूकडील टीबीएम अर्जुनाचा शुभारंभ करण्यात आला.
तसेच वांद्रे-कुर्ला संकुलाच्या जी ब्लॉकला पूर्व द्रूतगती मार्गासोबत जोडणाऱ्या उड्डाणपूलाला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब भोसले उड्डाणपूल नामकरणाचा कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृह येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या सेवेत येणाऱ्या आधुनिक उपनगरीय रेल्वे गाड्यांबाबत माहिती दिली.
मुंबईकरांच्या सेवेत मेट्रोसारख्या 238 उपनगरीय लोकल ट्रेन 2027 मध्ये येणार आहेत. मार्च 2030 पर्यंत संपूर्ण लोकल ट्रेन मेट्रोसारख्या होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सांगितले.
हेही वाचा