मुंबई लोकलला 'कवच' सुरक्षा मिळणार

2025 च्या अखेरीस मुंबईच्या (mumbai) उपनगरीय गाड्यांमध्ये कवच बसवण्यात येईल. प्रवाशांची सुरक्षितता सुधारण्यासाठी ही एक आधुनिक सुरक्षा प्रणाली आहे.

अहवालांनुसार, पश्चिम रेल्वे (western railway) मार्गांवर कवच बसवण्याचे काम आधीच सुरू झाले आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस सर्व उपनगरीय गाड्या आणि मुख्य मार्गावरील इंजिनांवर ही यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण करण्याची रेल्वेची योजना आहे.

ही प्रणाली सध्या दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसारख्या महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर बसवली जात आहे आणि ती 'मेक इन इंडिया' (Make in India) उपक्रमाचा एक भाग आहे.

मुंबई-अहमदाबाद मार्ग या आर्थिक वर्षाच्या अखेरीस तयार होण्याची अपेक्षा आहे. अहवालांनुसार रेल्वे टक्कर रोखण्यासाठी हे एक मोठे पाऊल असेल.

दररोज जवळजवळ 30 लाख लोक पश्चिम रेल्वेच्या (डब्ल्यूआर) उपनगरीय सेवांचा वापर करतात. चर्चगेट-विरार-डहाणू मार्गावर 110 इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट्सच्या ताफ्यासह 1,400 हून अधिक रेल्वे सेवा चालवतात.

2025 पर्यंत 2,358 किलोमीटरहून अधिक ट्रॅकवर कवच बसवण्याची रेल्वेची योजना आहे.


हेही वाचा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावरून रोपवे बांधणार

एअर इंडियाच्या सॅन फ्रान्सिस्को-मुंबई विमानात झुरळ

पुढील बातमी
इतर बातम्या