लोकल ट्रेन असो वा अत्याधुनिक मेट्रोचा वापर करण्यासाठी प्रवाशांना लांबलचक रांगेत ताटकळत उभं राहूनच तिकीट काढवं लागतं. लोकलच्या प्रवाशांची या रांगेतून सुटका होईल की नाही हे माहीत नाही; पण मेट्रो प्रवाशांची मात्र रांगेतून सुटका झाली आहे. 'मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड' (एमएमओपीएल)ने मेट्रो प्रवाशांना 'स्किप क्यू' प्रणाली अंतर्गत मोबाईलवर तिकीट उपलब्ध देत रांगेच्या समस्येवर मात केली आहे.
मेट्रोच्या 'स्किप क्यू' सेवेला गुरूवारपासून सुरूवात करण्यात आली. 'एमएमओपीएल'ने पेटीएमच्या मदतीने 'स्किप क्यू' सेवा सुरू केली असून हे तिकीट मेट्रो प्रवाशाला 'रीडलर' अॅपद्वारे मोबाईलवर उपलब्ध झालं, तर शुक्रवारपासून हे तिकीट 'पेटीएम' अॅपवर देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती 'एमएमओपीएल'कडून देण्यात आली आहे.
मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट करण्यासाठी 'स्किप क्यू' सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे प्रवाशांना स्मार्टफोनवरून घरबसल्या तिकीट काढता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. 'स्किप क्यू'ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल.
- अभयकुमार मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, एमएमओपीएल
'स्किप क्यू'च्या माध्यमातून 'एमएमओपीएल'ने सुरू केलेली मोबाईल सेवा ही देशातील पहिली मोबाईल सेवा असल्याचा दावाही 'एमएमओपीएल'ने केला आला आहे. तर या सेवेद्वारे तिकीटाबरोबरच पासचं नूतनीकरणही होणार आहे.
हेही वाचा-
'असा' आहे ठाणे-कल्याण-भिवंडीचा सुपरफास्ट मेट्रो मार्ग