Advertisement

'असा' आहे ठाणे-कल्याण-भिवंडीचा सुपरफास्ट मेट्रो मार्ग


'असा' आहे ठाणे-कल्याण-भिवंडीचा सुपरफास्ट मेट्रो मार्ग
SHARES

वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रो ४ प्रकल्पाचं काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यातच ठाणे-कल्याण-भिवंडी या मेट्रो ५ मार्गाला मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मंजुरीमुळे मुंबईकरांसोबतच ठाणे, कल्याण आणि भिवंडीकरांचं मेट्रो रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.

दुसरीकडे मुंबईकरांसाठीही एक खुशखबर आहे. ती म्हणजे मंत्रीमंडळाच्या बैठकीत लोखंडवाला-जोगेश्वरी-विक्रोळी-कांजुरमार्ग या मेट्रो ६ प्रकल्पालाही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. या दोन्ही मेट्रो प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याने आता या प्रकल्पांच्या बांधकामासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार मुंबईसह मुंबई महानगरात मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. मुंबईत मेट्रो १ कार्यान्वित झाली असून येत्या ४ ते ५ वर्षांत मेट्रो ३, मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील.


मेट्रो ५ मार्गावरील स्टेशन्स :

  1. कापूरबावडी
  2. बाळकुंभ नाका
  3. कशेळी
  4. काल्हेर
  5. पुर्णा
  6. अंजुर फाटा
  7. धामणकर नाका
  8. भिवंडी
  9. गोपाळ नगर
  10. टेमघर
  11. राजनवली व्हिलेज
  12. गोवेगाव एमआयडीसी
  13. कोणगाव
  14. दुर्गाडी फोर्ट
  15. सहजानंद चौक
  16. कल्याण रेल्वे स्थानक
  17. कल्याण एपीएमसी



ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रोची वैशिष्ट्ये

  • २४.९ किमी लांब
  • एकूण स्थानके १७
  • अपेक्षित खर्च ८,४१६ कोटी
  • पूर्णत: उन्नत मार्ग
  • प्रकल्पाचा आराखडा तयार


मेट्रो ६ मार्गावरील स्टेशन्स:

  1. लोखंडवाला काॅम्प्लेक्स
  2. आदर्श नगर
  3. मोमीन नगर
  4. जेव्हीएलआर
  5. श्याम नगर
  6. महाकाली केव्हज
  7. सिप्झ व्हिलेज
  8. साकी विहार रोड
  9. रामबाग
  10. पवई लेक
  11. आयआयटी पवई
  12. कांजुरमार्ग (प)
  13. विक्रोळी-पूर्व द्रूतगती मार्ग



लोखंडवाला-जोगेश्वरी-विक्रोळी-कांजुरमार्ग मेट्रोची वैशिष्ट्ये

  • १४.४७ किमी लांबी
  • एकूण स्थानके १३
  • अपेक्षित खर्च ६,६७२ कोटी
  • पूर्णत उन्नत मार्ग
  • मेट्रो २ आणि मेट्रो ३ ला जोडणार
  • विस्तृत आराखडा तयार


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा