म्हणून टळला मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसचा अपघात

मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसला होणारा मोठा अपघात सुदैवाने टळला. मंगळवारी सकाळी मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी खंडाळा घाटातील ठाकूरवाडी ते मंकी हिलदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले. मात्र, गॅंगमन सुनील कुमार यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एक्स्प्रेसला होणारा मोठा अपघात टळला.

आणि अपघात टळला

सकाळच्या सुमारास गॅंगमन सुनील कुमार हे पेट्रोलिंग करून घरी जात होते. त्यावेळी त्यांनी रुळाला तडे गेल्याचं पाहिलं. दरम्यान प्रसंगावधान दाखवत मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसच्या चालकाला याबाबत इशारा केला. त्यानुसार चालकानं तातडीनं एक्स्प्रेस थांबवली.

मदुराई एक्स्प्रेसला अपघात

काही दिवसांपूर्वी खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा डबा रुळावरून घसरल्यानं मोठा अपघात झाल्याची घटना घडली होती. मदुराई एक्स्प्रेसच्या मागच्या इंजिनकडून दाब वाढल्यानं डबा घसरला होता. मात्र, सुदैवानं या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती. परंतु, या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.


हेही वाचा -

मेल, एक्सप्रेसचं अनारक्षित तिकीटही मोबाइलवरून

पुढील बातमी
इतर बातम्या