Advertisement

मेल, एक्सप्रेसचं अनारक्षित तिकीटही मोबाइलवरून


मेल, एक्सप्रेसचं अनारक्षित तिकीटही मोबाइलवरून
SHARES

मेल आणि एक्सप्रेसच्या प्रवाशांनाही आता मोबाइलवरून अनारक्षित (करंट) तिकीट काढता येणार आहे.  प्रवाशांना मेल आणि एक्सप्रेस गाड्यांनी प्रवास करण्यासाठी चार ते पाच तास अगोदर आरक्षित तिकीट काढावे लागते. तर जनरल डब्यांचं तिकिट रेल्वे स्थानकावर रांगेत उभं राहून काढावं लागते. अाता मात्र, प्रवाशांना जनरल डब्यांसाठीचं अनारक्षित तिकीटही मोबाइलवर काढून प्रवास करता येणार आहे.  ही सुविधा मेल व एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवाशांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. सध्या मध्य व पश्चिम रेल्वेवरील लोकल प्रवाशांसाठी मोबाइल तिकीट सुविधा उपलब्ध अाहे. ज्यामध्ये प्रवाशांना अनारक्षित तिकीट काढता येतात.


क्रिसमार्फत चाचणी 

रेल्वेच्या 'क्रिस' (सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीम)ने प्रवाशांचा वेळ वाचवण्यसाठी पेपरलेस मोबाइल तिकीट सुविधा सुरु केली होती. मात्र, मोबाईल नेटवर्क आणि जीपीएसमधील तांत्रिक अडथळ्यांमुळं प्रवाशांना पेपरलेस तिकीट काढणं अडचणीचं ठरत होतं. मात्र, आता मेल आणि एक्सप्रेसचं तिकीट बुक करताना प्रवाशांना येणारे अडथळे कमी होणार आहेत. यासाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीम (क्रिस) मार्फत याबाबत चाचणी सुरु आहे.


तिकिटाची प्रत मोबाइलवर 

ऑनलाइन तिकीट काढल्यानंतर तिकिटाची सर्व माहिती मोबाइलवर येते. त्याचप्रमाणं तिकीटाची प्रत जवळ नसल्यास टीसीला मोबाइलवरील तिकीटाची माहिती दाखवून यापुर्वी प्रवास करता येत होता. मात्र, आता मोबाइल तिकीट सुविधेमध्ये तिकिटाची प्रत मोबाइलवर दिसणार आहे. 'क्रिस'द्वारे याबाबत चाचणी केल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेला त्याची चाचणी करण्यास सांगण्यात आलं असून दोन्ही रेल्वे विभागाकडून चाचणीचा सकारात्मक अहवाल प्राप्त होताच ही सुविधा पश्चिम व मध्य रेल्वेवरील मेल-एक्स्प्रेस प्रवाशांसाठी देखील सुरु केली जाणार आहे.



हेही वाचा - 

शिवशाहीच्या धडकेत पादचाऱ्याचा पाय तुटला

अस्वच्छ प्रसाधनगृहाची तक्रार अाता व्हाॅट्सअॅपवरुन




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा