Advertisement

शिवशाहीच्या धडकेत पादचाऱ्याचा पाय तुटला


शिवशाहीच्या धडकेत पादचाऱ्याचा पाय तुटला
SHARES

 मुंबई सेंट्रलमधील एसटी बस आगारात सोमवारी सकाळी शिवशाही बस पायावरून गेल्याने एका ५० वर्षीय पादचारी इसमाचा पाय तुटून पडला. मोहम्मद युसूफ शेख असं या इसमाचं नाव असून त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.

कशी घडली घटना

सोमवारी सकाळी ७.२० वाजताच्या सुमारास माजलगाव आगारातील माजलगाव-मुंबई ही शिवशाही बस (एमएच ०४ जेके २८४२ ) मुंबई सेंट्रल आगारात प्रवेश करत होती. यावेळी अागाराच्या बाहेर प्रवेश दाराजवळून मोहम्मद युसूफ शेख जात असताना त्यांना बसची धडक बसली. यात ते खाली पडून त्यांच्या उजव्या पायावरून बस गेली. यामध्ये त्यांचा पाय तुटला. या प्रकरणी शिवशाही बसच्या चालकाविरुद्ध नागपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला अाहे. 



हेही वाचा -

अस्वच्छ प्रसाधनगृहाची तक्रार अाता व्हाॅट्सअॅपवरुन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा