अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाचं ३५०० कोटींचं टेंडर

मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकल ट्रेनमधील अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ३५०० कोटी रुपयांचे टेंडर काढलं आहे. मुख्य म्हणजे रेल्वेने रुळांच्या दुरुस्ती कामासाठी हे टेंडर काढलं आहे.

पहिल्यांदाच मोठी खरेदी

रेल्वे प्रशासन अशा प्रकारे पहिल्यांदाच रेल्वेच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या ७ लाख टन एवढ्या सामानांची खरेदी करणार आहे. रेल्वे प्राधिकरण स्टील प्राधिकरण ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) या कंपनीकडून ही खरेदी करणार आहे.  

केंद्रीय मंत्रिमंडळाने ५ महिन्यापूर्वीच या टेंडरला मंजुरी दिली होती. रेल्वे नेहमीच अशा वेगवेगळ्या कामांसाठी 'सेल'कडून खरेदी करते. या 'सेल' ही देशातील सर्वात जास्त स्टील उत्पादन करणारी कंपनी आहे.


हेही वाचा - 

दोन दिवसांत रेल्वे अपघातात ३० मृत्यू


पुढील बातमी
इतर बातम्या