आठवड्याभरात रेल्वे अपघातात ५६ मृत्यू, ७६ जखमी


आठवड्याभरात रेल्वे अपघातात ५६ मृत्यू, ७६ जखमी
SHARES

दिवसेंदिवस रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढत असल्याने मुंबईची जीवनवाहिनी लोकल रेल्वे प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. मागील सहा दिवसांत मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही रेल्वे मार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये तब्बल ५६ प्रवाशांना आपला जीव गमावला आहे. तर ७६ प्रवासी जखमी झाले आहे.


रेल्वे प्रशासनाच्या उपाययोजना फोल

रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना फोल ठरत असून, प्रवाशांच्या मृत्यूसंख्येत होणारी वाढ रेल्वे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी एका दिवसात तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले. यापैकी बऱ्याच मृतांची ओळख पटलेली नाही. रेल्वे रूळ ओलांडताना सर्वांत जास्त अपघात झाल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.


कसे होतात अपघात ?

ट्रेनमधून पडणे, खांबांना धडकणे, ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत पडणे, ओव्हरहेड वायरचा शॉक लागणे, रुळांवर आत्महत्या करणे इ. कारणे अपघातांच्या मागे आहेत.


रेल्वे प्रशासनाने दिलेली अपघातांची आकडेवारी :


स्थानक
मृतांची संख्या
जखमींची संख्या
सीएसटीएम


दादर

कुर्ला


ठाणे


डोंबिवली


कल्याण

११
कर्जत


वडाळा रोड


वाशी


पनवेल


चर्चगेट


मुंबई सेंट्रल

११
वांद्रे


अंधेरी


बोरीवली
१०

वसई रोड


पालघर


एकूण
५६
७६

  हे देखील वाचा -

आता वसई, विरार, भाईंदर रेल्वे स्थानकांतही वायफाय

कशी पडली मुंबईतल्या रेल्वे स्टेशन्सची नावं? 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय