Advertisement

आता वसई, विरार, भाईंदर रेल्वे स्थानकांतही वायफाय


आता वसई, विरार, भाईंदर रेल्वे स्थानकांतही वायफाय
SHARES

पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील प्रमुख स्थानकांवरील प्रवाशांना मोफत हायस्पीड वायफायची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर आता रेल्वे प्रशासन वसई, विरार आणि भाईंदर रेल्वे स्थानकांतील प्रवाशांना देखील मोफत वायफाय उपलब्ध करून देत आहे.

रविवारी पश्चिम रेल्वेवरील तीन स्थानकांमध्ये या सेवेचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासन, गुगल आणि रेलटेल कंपनीच्या साहाय्याने ही हायस्पीड वायफाय सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली जात आहे.


४०० स्थानकांवर मिळणार सुविधा

येत्या तीन वर्षांत देशभरातील ४०० प्रमुख रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा पुरविण्यात येणार असून या योजनेचा भाग म्हणून टप्प्याटप्याने ही सेवा मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये सुरू करण्यात येत आहे. विनामूल्य वायफायची ही सेवा २०१८ अखेरपर्यंत या ४०० स्थानकांवर उपलब्ध करून दिली जाईल.


या स्थानकांवर सेवा

सद्यस्थितीत मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरीवली, चर्चगेट, सीएसटी, दादर, ठाणे, कल्याण या महत्वाच्या स्थानकांमध्ये ही सेवा सुरु आहे. केवळ एक पासवर्ड टाकून प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येतो.


प्रवासी सेवा-सुविधांचे लोकार्पण

याशिवाय रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे-पटणा हमसफर एक्स्प्रेस आणि गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस साप्ताहिक गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. बोरीवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १० वरील लिफ्टचे अनावरण, वायफाय सुविधा इ. सेवांचे लोकार्पण रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.



हे देखील वाचा -

रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या क्रशिंग मशीनमध्ये टाका

वायफाय कनेक्टचे मुंबईकरांचे स्वप्न भंगले



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा