Advertisement

रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या क्रशिंग मशीनमध्ये टाका


रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या क्रशिंग मशीनमध्ये टाका
SHARES

मुंबई - स्वच्छ भारत अभियानांतर्गत पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावर बॉटल क्रश मशीन बसवण्यात आले आहे. प्रवासी बॉटलची विल्हेवाट लावण्यासाठी या मशीनचा वापर करता येणार आहे. यानंतर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, अंधेरी, सांताक्रूझ, कांदिवली, गोरेगाव, बोरिवली, भाईंदर आदी स्थानकांवर 20 बॉटल क्रश मशीन बसवण्यात येणार आहेत.

प्रवासी पाणी पिऊन झाले की, रिकाम्या बाटल्या स्थानकांत किंवा रूळांवर फेकतात. यामुळे कालांतराने कचऱ्याचा मोठा खच तयार होऊन मान्सून काळात रेल्वेला याचे परिणाम निस्तरावे लागतात. रेल्वे स्थानक परिसर आणि रूळ स्वच्छ ठेवण्यासाठी पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने बॉटल क्रश मशीन लोकल डब्यातच बसवण्याची योजना देखील आखली आहे. पण सध्या 10 बॉटल क्रशिंग मशीन विविध स्थानकांवर बसवण्यात आल्या आहेत. आणखी दहा मशीन लवकरात लवकर बसवण्यात येतील, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सागितले.

बॉटल क्रशिंग मशीन वॉकहार्ट फाऊंडेशनमार्फत विविध रेल्वे स्थानकांवर बसवल्या जात आहेत. आता लोकल गाड्यांमध्ये अशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वॉकहार्ट फाऊंडेशनला महिती दिली असून फाऊंडेशनही सकारात्मक असून काम लवकरच सुरू केले जाईल, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement