वायफाय कनेक्टचे मुंबईकरांचे स्वप्न भंगले

मुंबई - शहर वायफाय मय होणार... हे ऐकूण प्रत्येक मुंबईकराला आनंद झाला. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ट्वीटरवरून वायफायच्या फेज 1 ची सुरुवात करताना आनंद होत असल्याचं सांगितलं. तसेच शहरातील विविध ठिकाणी सुमारे 500 हॉटस्पॉट तयार करण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र प्राथमिक टप्प्यात लावण्यात आलेले वायफाय कनेक्ट होत नसल्यानं ऐन निवडणुकीच्या काळात भाजपा तोंडावर आपटलंय.

याबाबत ‘मुंबई लाइव्ह’नं सरकारच्या आयटी विभागाशी संपर्क केला असता त्यांनी अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया दिलीय. मात्र एवढा गाजावाजा करून मुंबईकरांना वायफायचं गाजर दाखवणाऱ्या सरकारने मुंबईकरांची सध्या तरी घोर निराशा केलीय असं म्हणायला हरकत नाही.

Loading Comments