फुकट वायफायचा मुंबईकरांनी केला असा वापर!

  Mumbai
  फुकट वायफायचा मुंबईकरांनी केला असा वापर!
  मुंबई  -  

  मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी म्हणजेच ६ जानेवारीला राज्य सरकारने मुंबईत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करुन दिली. मुंबईकरांना यातून माहितीचा मोठा खजिना मोफत उपलब्ध व्हावा हा यामागचा उद्देश होता. प्रत्यक्षात मात्र काहीसं वेगळं चित्र समोर आलं आहे. या वायफायच्या एकूण युजर्सपैकी १० टक्के म्हणजेच तब्बल ३० हजार युजर्सनी या वायफायचा वापर चक्क पॉर्न फिल्म्स पहाण्यासाठी केल्याचं समोर आलं आहे. राज्य आयटी विभागाकडूनच ही माहिती उपलब्ध झाली आहे.

  निवडणुकांपूर्वी मुंबईत एकूण 510 ठिकाणी मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे मोफत वायफायची सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिले शहर बनले होते. सुरुवातीला मुंबईत विविध ठिकाणी 75 वायफायचे हॉटस्पॉट लावण्यात आले. त्यानंतर या हॉटस्पॉटची संख्या 585 पर्यंत वाढवण्यात आली. मात्र मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करुनही ३० हजार मुंबईकर त्याचा वापर पॉर्नोग्राफी बघण्यासाठी करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या योजनेच्या मूळ उद्देशालाच धक्का लागल्याचं चित्र उभं राहिलं आहे. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.