बोरिवली स्थानकावरील गाड्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये बदल, आता लोकल...

पश्चिम रेल्वेने (WR) शुक्रवारी सांगितले की, 11 फेब्रुवारीपासून बोरिवली (Borivali station) स्थानकावर काही गाड्यांचे प्लॅटफॉर्म बदलले गेले आहेत. (Mumbai local news) 

एका प्रसिद्धीपत्रकात, WR ने म्हटले आहे की, "बोरिवली स्थानकावरील प्रवाशांच्या सोयीसाठी 11 फेब्रुवारी 2023 पासून बोरिवली येथील काही गाड्यांचे नियोजित प्लॅटफॉर्म बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे." (Borivali news) 

प्लॅटफॉर्ममधील बदल खालीलप्रमाणे असतील

1. चर्चगेट – बोरिवली येथे 08.22 वाजता येणारी बोरिवली एसी लोकल ट्रेन आता पीएफ क्रमांक 2 ऐवजी पीएफ क्रमांक 3 वर येईल.

2. चर्चगेट – बोरिवली 08.25 वाजता येणारी बोरिवली लोकल ट्रेन आता PF क्रमांक 3 ऐवजी PF क्रमांक 2 वर येईल.

3. बोरिवली - बोरिवलीहून 08.26 वाजता सुटणारी चर्चगेट एसी लोकल ट्रेन आता पीएफ नंबर 2 ऐवजी पीएफ नंबर 3 वर येईल.

4. बोरिवली - बोरिवलीहून 08.30 वाजता सुटणारी चर्चगेट लोकल आता PF क्रमांक 3 ऐवजी PF क्रमांक 2 वर येईल.


हेही वाचा

एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

महाशिवरात्रीनिमित्त बेस्टची विशेष बस सेवा, 'या' मार्गांवर धावणार

पुढील बातमी
इतर बातम्या