Advertisement

महाशिवरात्रीनिमित्त बेस्टची विशेष बस सेवा, 'या' मार्गांवर धावणार

बेस्ट उपक्रमाने १८ फेब्रुवारीला या मार्गांवर ही बस सेवा धावणार आहे.

महाशिवरात्रीनिमित्त बेस्टची विशेष बस सेवा, 'या' मार्गांवर धावणार
SHARES

महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक कान्हेरी लेणी आणि बाबुलनाथ मंदिराला भेट देतात. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने १८ फेब्रुवारी रोजी बोरिवली (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी आणि दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.



महाशिवरात्रीनिमित्त १८ फेब्रुवारी रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी या मार्गावर बसमार्ग क्रमांक १८८ ( मर्या.) च्या ६ अतिरिक्त बस फेऱ्या सकाळी १०.३० ते सायंकाळी ७. ३० दरम्यान चालवण्यात येणार आहेत.


तसेच बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसमार्ग क्रमांक ५७ वाळकेश्वर ते पी. टी. उद्यान – शिवडी, बसमार्ग क्रमांक ६७ वाळकेश्वर ते ॲन्टॉप हिल आणि बसमार्ग क्रमांक १०३ वाळकेश्वर ते कुलाबा बस स्थानक या मार्गांवर सकाळी ७ ते सायंकाळी ७ दरम्यान ६ अतिरिक्त बस फेऱ्या चालविण्यात येतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमातर्फे देण्यात आली आहे.



हेही वाचा

मरीन लाइन्स स्थानकावरील दक्षिण बाजूचा फूट ओव्हर ब्रिज १५ फेब्रुवारीपासून बंद

मुंबई मेट्रो 2A आणि 7 च्या वेळेत वाढ,जाणून घ्या वेळापत्रक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा