Advertisement

मुंबई मेट्रो 2A आणि 7 च्या वेळेत वाढ,जाणून घ्या वेळापत्रक

प्रवाशांची गरज लक्षात घेता महामेट्रोने फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

मुंबई मेट्रो 2A आणि 7 च्या वेळेत वाढ,जाणून घ्या वेळापत्रक
SHARES

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMMOCL), मुंबई मेट्रो लाईन्स 2A आणि 7 चे या दोन्ही मेट्रो मार्गांवरील सेवांच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गरज लक्षात घेता महामेट्रोने फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

सोमवारी जारी केलेल्या निवेदनात, MMMOCL ने घोषणा केली की 22.09 वाजता सुटणाऱ्या शेवटच्या ट्रेनऐवजी, 22.30 तासांपर्यंत ऑपरेटिंग तास वाढवण्यासाठी दोन्ही मार्गांवर दोन अतिरिक्त सेवा सुरू केल्या जातील.

दोन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर निर्णय

दोन्ही मार्गावरील वाढीव वेळ पुढील दोन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित केल्या जातील. जर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल.

“एमएमएमओसीएलने प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो सेवांच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेतला. सध्या, आमच्याकडे 28 मेट्रो रेक आहेत जे दोन्ही मार्गांवर चालण्यासाठी पुरेसे आहेत. आम्ही या अतिरिक्त सेवांद्वारे प्रवाशांच्या प्रतिसादाचे निरीक्षण करत राहू आणि गरज भासल्यास आम्ही पीक अवर्समध्ये सेवा वाढवण्याचा निर्णय घेऊ,” असे MMMOCL चे अध्यक्ष एस व्ही आर श्रीनिवास यांनी सांगितले.

सेवांमध्ये वाढ खालीलप्रमाणे असेल:

अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व 22.20 आणि 22.30 वाजता. (दोन सेवा)

गुंदवली ते डहाणूकरवाडी मार्गे दहिसर पूर्व 22.20 आणि 22.30 वाजता. (दोन सेवा)

विविध स्थानकांवरील शेवटच्या गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

• गुंदवलीहून अंधेरी पश्चिमेसाठी शेवटची ट्रेन – 21:30 वाजता

• गुंदवलीहून डहाणूकरवाडीसाठी शेवटची ट्रेन – 22:30 वाजता

• गुंदवलीसाठी अंधेरी पश्चिमेकडून शेवटची ट्रेन – 21:30 वाजता

• अंधेरी पश्चिमेकडून दहिसर पूर्वेसाठी शेवटची ट्रेन – 22:30 वाजता

• दहिसर पूर्वेकडून अंधेरी पश्चिमेसाठी शेवटची ट्रेन – 22:03 वाजता

• गुंदवलीसाठी दहिसर पूर्वेकडून शेवटची ट्रेन – 22:08 वाजता

• डहाणूकरवाडीसाठी दहिसर पूर्वेकडील शेवटची ट्रेन – 23:11 वाजता



हेही वाचा

भारतातील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत

मुंबईकरांसाठी बेस्टची लवकरच 55 ठिकाणी ई-चार्जिंगची सुविधा, वाचा संपूर्ण यादी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा