Advertisement

भारतातील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत

मुंबईकरांसाठी डबलडेकर बस हे विशेष आकर्षण आहे. जाणून घ्या तिकिट आणि मार्ग

भारतातील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत
SHARES

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात पहिली वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बस दाखल झाली आहे. आकर्षक आणि आरामदायी असणारी ही बस आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली.

ही बेस्ट सेवा वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानक, अशी असणार आहे. त्यानंतर ही बस दक्षिण मुंबईतील काही मार्गांवरुन धावणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉइंट, कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रुझ या मार्गांवर या बसेस धावताना दिसतील. या बसचं किमान अंतरासाठीचं भाडं सहा रुपये असणार आहे.

बेस्ट उपक्रमामध्ये सध्या ४५ वातानुकूलित बस आहेत. यातून ५४ ते ६० प्रवासी प्रवास करू शकतात. बेस्टमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या डबलडेकर बसची एकूण प्रवासी क्षमता ७६ इतकी आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, चालक-वाहक यांच्यातील संपर्कासाठी विशेष व्यवस्था, दोन्ही बाजूंना स्वयंचलित दरवाजे अशी या बसची वैशिष्ट्ये आहेत.

बेस्टने मागील काही कालावधीपासून प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. वातानुकूलित बससेवेसह तिकीट प्रणालीही आधुनिक स्तरावर उपलब्ध केली आहे. त्यात आतापर्यंत एसी डबलडेकर बसचा अभाव होता. बेस्टने ही कमतरता भरून काढत अशी सेवा पुरवण्याचे ठरवले आहे.

मुंबईकरांसाठी डबलडेकर बस हे विशेष आकर्षण आहे. जुन्या साध्या डबलडेकर बस हळूहळू कालबाह्य होणार आहेत. त्याऐवजी वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बस सेवेत आणल्या जात आहेत.

चाचणी प्रमाणपत्रामुळे विलंब

पहिल्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसला ऑगस्ट २०२२मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. त्यानंतर पुण्यात एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया) सेंटरमध्ये या बसच्या चाचणीला सुरुवात झाली.

सप्टेंबर त्यानंतर ऑक्टोबर आणि नंतर १४ जानेवारीपर्यंतच्या मुहूर्तावर ही बस प्रवाशांच्या सेवेत येणार होती. मात्र चाचणीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी विलंब झाल्याचे सांगण्यात येते.

अशा आहेत सुविधा...

  • सीसीटीव्ही कॅमेरे

  • चालक-वाहक यांच्यातील संपर्कासाठी विशेष व्यवस्था

  • दोन्ही बाजूंना स्वयंचलित दरवाजे

  • दरवाजे उघडबंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे



हेही वाचा

बोरिवली स्थानकावरील गाड्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये बदल, आता लोकल...

मीरा रोड स्टेशन ते दहिसर मेट्रो स्टेशनपर्यंत नवीन बेस्ट बस सुरू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा