Advertisement

मुंबईकरांसाठी बेस्टची लवकरच 55 ठिकाणी ई-चार्जिंगची सुविधा, वाचा संपूर्ण यादी

बेस्टच्या ई – चार्जिंग स्थानकात (e-charging stations ) खाजगी वाहनांनाही आपले वाहन चार्जिंग करता येणार आहे.

मुंबईकरांसाठी बेस्टची लवकरच 55 ठिकाणी ई-चार्जिंगची सुविधा, वाचा संपूर्ण यादी
SHARES

बेस्ट बसेससाठी आता आगारात ई -चार्जिंगची सुविधा उभारण्यात येत आहे. या ई – चार्जिंग स्थानकात (e-charging stations ) खाजगी वाहनांनाही आपले वाहन चार्जिंग करता येणार आहे. मुबईकरांची सेकंड लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टने एकूण 55 ठिकाणी तब्बल 330 ई – चार्जिंग स्टेशन उभारण्याची घोषणा केली आहे.

बेस्ट मुंबईकरांना प्रदुषणमुक्त प्रवास घडविण्यासाठी आपल्या ताफ्यात मार्च 2024 पर्यंत तब्बल चार हजार ई-बसेसचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेस्टने या बसेस चार्ज करण्यासाठी एकूण 55 ठिकाणी तब्बल 330 ई – चार्जिंग स्टेशनची उभारणी करणार आहे. त्यातील दहा चार्जिंग स्टेशन मार्च 2023 पर्यंत तयार होणार आहेत.

बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, या महिन्याअखेर काही ठिकाणची ई- चार्जिंग स्टेशन तयार होतील, काही ठिकाणी आम्हाला कनेक्टीव्हीटीचा इश्यू होत आहे. तर काही ठिकाणी मीटर आणि वीज कनेक्शनची अडचण होत आहे. त्यावर मात करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“आमच्या वाहनांसाठी ई – चार्जिंगकरण्यासाठी आम्ही सुविधा निर्माण करीत आहोत. शाळांच्या बसेससह खाजगी वाहन चालकही त्यांच्या कार आणि टु व्हीलर येथे चार्ज करू शकतील,” असेही महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

बेस्टच्या खाजगी बसेससाठी रेव्हेन्यू शेअरींग बेसिसवर चार्जिंगची सुविधा असेल. चार्जिंगचा रेट प्रत्येक युनिट मागे निश्चित केला जाणार असून तो सर्वसामान्यांना परवडणारा असेल, तसेच बेस्टमधील खाजगी बसेससाठी रेव्हेन्यू शेअरींग बेसिसवर तो आकारला जाईल असे त्यांनी सांगितले.

बेस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार एकूण 55 ठिकाणांची ( बस डेपो आणि स्थानक ) ई – चार्जिंग स्टेशनची निवड वाहनांच्या पार्कींगसाठी पुरेशी जागा आणि सोयीसुविधा पाहून केली जात आहे. त्यामुळे अनेक वाहनांना एकाच वेळी चार्जिंक करता येईल.

प्रवाशांना त्यांची चार्जिंगची जागा स्लॉट पाहून बुक करता येईल. त्यामुळे खाजगी वाहनचालकांना ऑनलाईन सेवेद्वारे आपला स्लॉट बुक करून जागा निश्चित झाल्यावर ऑनलाईन पैसे भरता येतील असे चंद्रा यांनी स्पष्ट केले आहे.

  • कुलाबा
  • बॅकबे
  • एनसीसीआय
  • मंत्रालय
  • म्युझियम
  • हिरानंदानी बस स्टेशन
  • ताडदेव बस स्टेशन
  • वांद्रे रेक्लमेंशन
  • वांद्रे पूर्व बस स्थानक
  • माहिम बस स्थानक
  • वांद्रे पश्चिम बस स्थानक
  • गोरेगाव बस डेपो
  • गोरेगाव पश्चिम बस स्थानक
  • सेव्हन बंगलो बस स्थानक
  • वाळकेश्वर बस स्थानक



हेही वाचा

भारतातील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत

मीरा रोड स्टेशन ते दहिसर मेट्रो स्टेशनपर्यंत नवीन बेस्ट बस सुरू

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा