वाहतुक कोंडीतून मुक्ती आणि कमी पैशांमध्ये आता नवी मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे हा प्रवास फास्ट आणि गारेगार असणार आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत.
डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो सुरू करण्यासाठी सिडकोनं प्रयत्न सुरू केले आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर खरोखर मेट्रोचे काम वेगानं सुरू झाले.
मेट्रोचे तिकिट दर
किलोमीटर | दर |
० ते २ | १० रुपये |
२ ते ४ | १५ रुपये |
४ ते ६ | २० रुपये |
६ ते ८ | २५ रुपये |
८ ते १० | ३० रुपये |
पेंधरपासून ते सेंट्रल पार्क दरम्यानच्या मार्गावर मेट्रोची चाचणी पूर्ण झाली आहे. नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा हा अकरा किलोमीटरचा आहे आणि याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. अशी माहीती डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे. दर किलोमीटरच्या पुढे ४० रूपये मेट्रोचा दर ठेवण्यात आला आहे.
सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी या मेट्रो प्रवासाच्या दराची घोषणा केली आहे. नवी मुंबई मेट्रोचा प्रकल्प २०११ मध्ये सुरू करण्यात आला होता. मात्र, त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले होते. यामुळे मेट्रो प्रकल्पाचे काम बरेच वर्ष रखडले होते.
एनएमएमटी वातानुकूलित बसपेक्षाही मेट्रोचा तिकिट दर कमी आहे. यामुळे आता सर्वसामान्य लोकही मेट्रोनं प्रवास करू शकणार आहेत.
हेही वाचा