मध्य प्रदेशमधून मुंबई, पुणेसाठी नवीन विमानसेवा

मध्य प्रदेशमधून मुंबई आणि पुणेसाठी आता नवीन विमानसेवा सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातून मुंबई, पुण्यासह आठ मार्गांवर विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली आहे. 

सरकारने उड्डाण योजनेअंतर्गत नवी १०० विमानतळे सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. आधीचे नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी या योजनेअंतर्गत एक हजार मार्गांवर विमानसेवा सुरू करण्यासाठी योजना तयार करण्यात येत असल्याचे म्हटलं होतं.

१६ जुलैपासून नवी सेवा सुरू करण्याची घोषणा ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली आहे. त्यामध्ये मुंबई, पुणे, सुरत या शहरांसाठीच्या सेवेचा समावेश आहे. ही नवी विमानसेवा – ग्वाल्हेर – मुंबई – ग्वाल्हेर-, ग्वाल्हेर – पुणे – ग्वाल्हेर, जबलपूर – सुरत – जबलपूर,  अहमदाबाद – ग्वाल्हेर – अहमदाबाद अशी असणार आहे.

ज्योतिरादित्य शुिंदे काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपात आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांचे वडील १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला याच खात्याचे मंत्री होते. 



हेही वाचा -

मुंबईतील 'या' भागांत मंगळवारी पाणीपुरवठा बंद अथवा कमी दाबानं होणार

तर निवडणुकीत सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार टाकू; राज्यातले व्यापारी संतापले

पुढील बातमी
इतर बातम्या