ठाणे-दिवा रेल्वेमार्गिका : मुंबईकरांना होणार 'हे' ५ फायदे

(Twitter/@@Central_Railway)
(Twitter/@@Central_Railway)

ठाणे ते दिवा दरम्यान ५व्या आणि ६व्या मार्गिकेचं (Thane – Diva Railway Track) उद्धाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडलं. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) या कार्यक्रमासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या मार्गिकेवरुन रेल्वे गाडी धावली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांचे सहाय्य नेहमीच महाराष्ट्राला लाभतं आणि पुढेही लाभेल अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

ठाणे ते दिवा दरम्यान या दोन्ही लाईन्स सुरू होण्यामुळे मुंबईकरांना थेट पाच फायदे होणार आहेत.

  • लोकल एक्स्प्रेस ट्रेनसाठी वेगवेगळी लाईन असेल.
  • दुसऱ्या राज्यातील येणाऱ्या ट्रेनला लोकलच्या पासिंगचा वाट पाहावी लागणार नाही.
  • कल्याण ते कुर्ला सेक्शनला मेल एक्सप्रेस कोणत्याही अडथळ्या शिवायच चालेल.
  • कळवा आणि मुंब्र्यातील लोकांचा मेगा ब्लॉकचा त्रास कमी होईल.
  • मध्य रेल्वेवर (central railway) ३६ नव्या लोकल सुरू करण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंती आहे. महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचं लोकार्पण होत आहे ही आनंदाची बाब आहे, असं मोदी म्हणाले.

आजपासून मध्यरेल्वेवर ३६ नव्या लोकल सुरू होणार आहेत. त्यात एसी ट्रेनचा समावेश आहे. पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू होत आहे हा केंद्र सरकारच्या वचनाचा हा परिपाक आहे. मुंबईत गेल्या सात वर्षात मेट्रोचाही विस्तार झाला आहे. उपनगरात मेट्रोचा विस्तार होत आहे, असं मोदींनी सांगितलं.


हेही वाचा

एसी लोकलचे दर कमी होणार, रेल्वेमंत्र्यांचे संकेत

गुडन्यूज! मुंबईकर तासाभरात शिर्डी गाठू शकतील...

पुढील बातमी
इतर बातम्या