Advertisement

गुडन्यूज! मुंबईकर तासाभरात शिर्डी गाठू शकतील...

नागपूर-मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा डीपीआर लवकरच पूर्ण होईल.

गुडन्यूज! मुंबईकर तासाभरात शिर्डी गाठू शकतील...
(Representational Image)
SHARES

जर सर्व काही नियोजनानुसार झाले, तर मुंबईकरांना भविष्यात फक्त १ तास १० मिनिटांत शिर्डी गाठता येईल. सध्या, मुंबई-शिर्डी सुपर-फास्ट ट्रेनला दोन्ही शहरांचे अंतर कापण्यासाठी ६ तास ५ मिनिटे लागतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) जवळपास तयार आहे. जो फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात रेल्वे मंत्रालयाला सादर केला जाईल.

DPR नुसार, (अद्याप रेल्वे मंत्रालयाला सादर करणे बाकी आहे) प्रस्तावित मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन BKC इथून सुरू होईल, आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या बांधकामाधीन मार्गानं ठाण्यापर्यंत जाईल. ठाण्याहून शहापूर, घोटी, इगतपुरीमार्गे नाशिकपर्यंत धावेल. त्यानंतर तो शिर्डीला जोडेल, त्यानंतर समृद्धी महामार्ग प्रकल्पासोबतच हा प्रस्तावित कॉरिडॉर नागपूरला जोडेल.

सुमारे ७५० किमी लांबीच्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या बांधकामासाठी रेल्वेला सुमारे रुपये १.५ लाख कोटी, ज्यात जवळपास डझनभर स्टेशन्स असतील.

प्रस्तावित वेगाबद्दल विचारले असता, सूत्रांनी सांगितले की, या मार्गाचा कमाल अनुज्ञेय वेग सुमारे ३५० किमी प्रति तास असेल. प्रस्तावित हाय-स्पीड ट्रेन मुंबई (BKC) आणि नागपूरचे प्रस्तावित बुलेट ट्रेन स्टेशन दरम्यानचे अंतर फक्त ३ तास ३० मिनिटांत पूर्ण करू शकतील. सध्या, सध्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्यांना सुमारे ११ ते १२ तास लागतात.

मुंबईच्या जलद आणि धीम्या लोकलप्रमाणेच, प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गावरही दोन प्रकारच्या सेवा असतील. डीपीआरनुसार बुलेट ट्रेनची धीम्या गतीनं सेवा सर्व स्थानकांवर थांबेल. यास सुमारे ४ तास १५ मिनिटे लागतील. तथापि, या प्रस्तावित मार्गावरील एक्स्प्रेस सेवा केवळ प्रमुख स्थानकांवर थांबेल आणि मुंबई शिर्डी हे अंतर फक्त १ तास १० मिनिटांत पूर्ण करेल.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) प्रगत अवस्थेत असून तो लवकरच पूर्ण होईल.

भूसंपादनाबाबत विचारले असता, एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, आमच्याकडे आधीच जवळपास ७० टक्के जमीन असल्याचा फायदा आम्हाला आहे. आम्हाला फक्त ३० टक्के जमीन खाजगी पक्षांकडून घ्यायची आहे.

या प्रकल्पाच्या पूर्णत्वाच्या तारखेबाबत विचारले असता दानवे यांच्या टीमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "आम्ही २०२४ पर्यंत काम सुरू करू इच्छितो. एकदा काम सुरू झाल्यावर आम्ही ते ७ वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू."



हेही वाचा

मुंबई ते नवी मुंबईचा प्रवास जलद, वॉटर टॅक्सी सेवेचं उद्घाटन

पुणे-शिर्डी-नागपूर विमानसेवा शुक्रवारपासून सुरू

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा