भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी ठिकाणांवर स्ट्राईक केला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला.
भारताच्या लष्करी कारवाईचे एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी स्वागत केले आहे.
आमच्या संरक्षण दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे मी स्वागत करतो. पाकिस्तानी डीप स्टेटला एक कठोर धडा शिकवला पाहिजे की आणखी एक पहलगाम पुन्हा कधीही होणार नाही. पाकिस्तानची दहशतवादी पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट केली पाहिजे. जय हिंद! असं ट्विट AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केलं आहे.
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी ने 'X' पर लिखा: "मैं हमारी रक्षा सेनाओं द्वारा पाकिस्तान में आतंकवादी ठिकानों पर किए गए लक्षित हमलों का स्वागत करता हूं। पाकिस्तानी डीप स्टेट को ऐसी सख्त सीख दी जानी चाहिए कि फिर कभी दूसरा पहलगाम न हो। पाकिस्तान के आतंक ढांचे को पूरी तरह नष्ट कर देना… pic.twitter.com/fud4QgKl7K
— ANI_HindiNews (@AHindinews) May 7, 2025
दरम्यान, भारतीय सैन्याने शस्त्रसंधी उल्लंघनाला अतिशय प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले, जिथे पाकिस्तानी सैन्याने तोफांचा वापर केला. भारताच्या जोरदार प्रत्युत्तरात पाकिस्तानी सैन्याचे नुकसान झाले आहे. तसेच आता "जगाने दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलता दाखवली पाहिजे," असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्वविटरवर लिहिलं आहे.
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर मध्यरात्री 1 वाजून 44 च्या सुमारास हल्ला केला अन् दहशतवाद्यांची ठिकाणं उद्धवस्त केली. भारतीय सैन्याच्या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं आहे.
भारतात गेल्या तीन दशकांपासून दहशतवाद पसरवणारे दोन मोठे गट असलेले जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लष्कर-ए-तैयबा सैन्याचं प्रमुख लक्ष्य होतं. भारतीय सैन्याने जवळजवळ 12 दहशतवादी मारले गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अशातच आता यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा