पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 25 भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता.
पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले होते. यावेळी महिला पर्यटकांऐवजी त्यांच्या पतींना लक्ष्य केले गेले आहे. जेणेकरुन त्यांच्या मागण्या पूर्ण होऊ शकतील. या क्रूर कृत्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने जोरदार मोहीम राबवली.
‘ऑपरेशन सिंदूर’ या नावामागे केवळ लष्करी संकेत नसून, दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा निर्धार होता. ज्या सिंदूराला त्यांनी लक्ष्य केले, त्याच सिंदूराच्या नावाने भारताने ही कारवाई केली. ही कारवाई अत्यंत थेट आणि अचूक ठिकाणी होती.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं होतं. महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या पतींवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव ‘मिशन सिंदूर’ ठेवण्यात आले.
भारतीय सैन्य दलाने या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवला आहे. यापुढे दहशतवाद्यांनी कोणत्याही महिलेचे कुंकू पुसण्याची हिंमत केली तर ते युद्धासारखं मानलं जाईल हा स्पष्ट संदेश या प्रत्युत्तरातून दिला आहे.
'ऑपरेशन सिंदूर' ही आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स अशा तिन्ही दलांची संयुक्त कारवाई होती. ज्यामध्ये दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी अचूक शस्त्रांचा वापर करण्यात आला.
या कारवाईत, भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत. रात्री दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे हे हवाई हल्ले करण्यात आले आहेत.
हेही वाचा