लोकल प्रवासासाठी लसीकरणाचे दोन डोस आवश्यक नाही, पण...

मुंबई लोकलसंबंधी (Mumbai Local) एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वीसारखे आता लोकल प्रवासासाठी लसीकरणाचे दोन डोस (Vaccination) झालेले असणे आवश्यक नाही. आता लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही लोकल प्रवास करता येणार आहे. मात्र यावेळी लसीकरण पूर्ण करून घ्या असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ठणकावले आहे.

दोन डोसची अट जरी हटवण्यात आली असली तरी गाफील राहून चालणार नाही, आपल्याला अजूनही काळजी घ्यावी लागेल. पूर्ण निष्काळजीपणे वागून चालणार नाही. त्यामुळे सर्वांनी आपलं लसीकरण पूर्ण करून घ्या, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बजावले आहे.

महामारीत लावण्यात आलेले दोन महत्त्वाचे कायदे अखेर मागे घेण्यात आले आहेत. आता निर्बंध कोणतेही असणार नाही. राज्यातील कोरोनाचे निर्बंध मागे घेण्यात आले असले, तरिही प्रत्येकाला काळजी आणि खबरादारी ही घ्यावी लागणारच आहेत. कुणीही बेजबाबादारपणे वागू नये. काळजी घेत राहावी लागणारच आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मास्कमुक्तीची घोषणा देखील गुरुवारी करण्यात आली. यावर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, मास्क लावणे जरी ऐच्छिक असले तरी सर्वांनी खबरदारी म्हणून मास्क लावा. गर्दीच्या ठिकाणी अजूनही आपण आपल्या आरोग्यासाठी काही नियम पाळले पाहिजेत असेही टोपे म्हणाले आहेत. गेल्या दोन वर्षापासून आपण निर्बंधात आहोत, मात्र आता अखेर उद्यापासून पूर्ण मोकळीक मिळणार आहे.


हेही वाचा

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मास्कमुक्ती! नव्या वर्षात घ्या मोकळा श्वास

उत्साहात साजरे करा सण, महाराष्ट्रातील सर्व कोरोना प्रतिबंध हटवले

पुढील बातमी
इतर बातम्या