गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मास्कमुक्ती (Mask not compulsory in Maharashtra) करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली की, राज्यात आता मास्क वापरणं बंधनकारक नाही. (Maharashtra new corona guidelines)
राजेश टोपे म्हणाले की, मास्क बंधनकारक नाही. (Mask is not compulsory in mumbai) मास्क ज्यांना घालायचं आहे ते घालू शकतात. नाही घातला तरी कुठल्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही.
महामारीत लावण्यात आलेले दोन महत्त्वाचे कायदे अखेर मागे घेण्यात आले आहेत. आता निर्बंध कोणतेही असणार नाही. राज्यातील कोरोनाचे निर्बंध मागे घेण्यात आले असले, तरिही प्रत्येकाला काळजी आणि खबरादारी ही घ्यावी लागणारच आहेत. कुणीही बेजबाबादारपणे वागू नये. काळजी घेत राहावी लागणारच आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
अमेरिका, इंग्लड या देशांनी मास्कमुक्तीही केली आहे, पण आपण मास्क (Mask free Maharastra) ऐच्छिक ठेवलेला आहे. शोभायात्रा आपल्याला साजऱ्या करता येतील. डॉ. बाबासाहेबांची जयंती आपण उत्साहात साजरी करू शकू. हा जो काही सातत्याने प्रश्न विचारला जायचा, त्या प्रश्नाला या निर्णयातून घोषणा केली आहे, असंही टोपे यांनी सांगितलं.
गेल्या अनेक दिवसांपासून मास्क (Mask Free mumbai) हटवणार की नाही यासंदर्भात चर्चा सुरू होती. त्यानुसार आज मंत्रीमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याबाबत एकमत झालं. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली.
आज मंत्रिमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध (Covid-19 Rules) एकमताने उठवण्यात आले. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं, राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीनंतर राज्य सरकारकडून अधिकृत पत्रक काढून या संदर्भात माहिती देण्यात येईल.
मार्च २०२० पासून राज्यात कोरोना निर्बंध (COVID-19 restrictions in the state) लागू करण्यात आले होते. त्यानंतर हळू हळू निर्बंधातून सूट देण्यात आले होते. आता राज्यात सर्व प्रकराचे निर्बंध हटवण्यात आले आहेत.
हेही वाचा