पुणे-शिर्डी-नागपूर विमानसेवा शुक्रवारपासून सुरू

पुणे- शिर्डी- नागपूर विमानसेवा येत्या शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे. तर पुणे- औरंगाबाद- नागपूर ही विमानसेवा १ मार्चपासून सुरू होणार असल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी जाहीर केले.

राज्यातील विविध शहरांतील विमानतळांचा विकास आणि नवीन सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅन्ड अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं दीपक कपूर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

राज्यातील विमानतळांच्या समस्या सोडवणं आणि विकास करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरनं निवेदनाद्वारे केलेल्या सूचनाबाबतही सकारात्मक विचार करून अंमलबजावणी करण्यात येईल. तसंच राज्यातील विमानसेवांचा कालबद्ध विकास केला जाईल अशी ग्वाही कपूर यांनी दिली.

नोव्हेंबर २०२२ पासून अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही दीपक कपूर यांनी सांगितल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे देण्यात आली.

अन्य शहरांसाठी काय?

  • कोल्हापूर व रत्नागिरी विमानतळासाठी लागणारा निधी महाराष्ट्र सरकार मंजूर करणार.
  • शिर्डी इथं स्वतंत्र मालवाहतूक टर्मिनल उभारणार
  • अमरावती इथल्या विमानतळासाठी केंद्राकडून ५२ कोटी रुपये मंजूर, पहिल्या टप्प्यात ६.५ कोटी रुपये प्राप्त


हेही वाचा

पुढील महिन्यापासून 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' धावण्याची शक्यता

एकाच कार्डवर लवकरच करता येणार बेस्ट, रेल्वे आणि मेट्रोचा प्रवास

पुढील बातमी
इतर बातम्या