Advertisement

पुढील महिन्यापासून 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' धावण्याची शक्यता

मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे.

पुढील महिन्यापासून 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' धावण्याची शक्यता
SHARES

मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' मार्ग लवकरच खुला होणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची सुरक्षा चाचणी पूर्ण झाली असून केवळ मेट्रो रुळांची सुरक्षा चाचणी शिल्लक आहे.

या चाचणीनंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो सेवेत दाखल करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ही प्रक्रिया पुढील काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता असून मार्चमध्ये या दोन्ही मेट्रो सेवा कार्यरत होतील अशी शक्यता आहे.

मेट्रो सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीत किमान १० ते १५ टक्क्यांनी घट होईल असं म्हटलं जात आहे. त्याशिवाय लोकल ट्रेनमधील गर्दी कमी होण्याचा अंदाज आहे.

मेट्रोच्या या दोन्ही मार्गिकेसाठी जानेवारीत ‘रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन’चे (आरडीएसओ) दर्जाविषयीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हे प्रमाणपत्र दोन टप्प्यांत मिळते. त्यानुसार मेट्रो गाडय़ांची सुरक्षा चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. आता केवळ रुळांची चाचणी शिल्लक आहे.

‘मेट्रो 2 अ’ आणि ‘मेट्रो 7’च्या पहिल्या टप्प्यासाठी एकूण १० मेट्रो गाडय़ा वापरण्यात येणार आहेत. या गाड्यांची चाचणी मागील कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. तर आता या गाड्यांची सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता या गाड्या प्रवासी क्षमतेसह धावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

तर दुसरीकडे पहिल्या टप्प्यात मेट्रोचे व्यवस्थापन आणि मेट्रो चालविण्याची जबाबदारी एक स्वतंत्र यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या आधिपत्याखाली असलेल्या या यंत्रणेनं आवश्यक त्या मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे. त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले असून सेवा देण्यासाठी कर्मचारीवृंद सज्ज झाला आहे.

'मेट्रो 2 अ' हा १८.५ किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत 'मेट्रो 2 अ' मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत.हेही वाचा

एकाच कार्डवर लवकरच करता येणार बेस्ट, रेल्वे आणि मेट्रोचा प्रवास

‘डेक्कन क्वीन’चं नव रूप पाहिलत का?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा