Advertisement

‘डेक्कन क्वीन’चं नव रूप पाहिलत का?

मुंबई ते पुणे या रेल्वे मार्गावर धावणारी ‘डेक्कन क्वीन’ आता नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

‘डेक्कन क्वीन’चं नव रूप पाहिलत का?
SHARES

मुंबई ते पुणे या रेल्वे मार्गावर धावणारी ‘डेक्कन क्वीन’ आता नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ‘डेक्कन क्वीन’ला एलएचबी डबे जोडण्यात आले आहे. विनाईल पेंटिंग म्हणजे वॉटरप्रूफ आणि युव्ही प्रीटिंग स्टीकरप्रमाणे या एलएचबी डब्यांना आत-बाहेरून रंगरंगोटी करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

या डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारला (धावते उपाहारगृह) एलएचबी रूपात आणण्याचे शिवधनुष्य आयसीएफ कारखान्याने अलगद पेलले आहे. ही नवीन डायनिंग कार पारंपरिक आयसीएफ कोचच्या तुलनेत जरा रुंद असणार असून अग्निशमन उपकरणांनी सुसज्ज असणार आहे.

पारंपरिक आयसीएफ कोचचे डबे बदलून त्या जागी नव्या तंत्रज्ञानाचे हलके पणे मजबूत एलएचबी डबे वापरण्यात आले आहेत. नव्या कोचमध्ये जुन्या कोचच्या तुलनेत अधिकची जागा आहे.

त्यामुळे मुंबई ते पुणे रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऑम्लेट सॅण्डविच, कटलेट सॅण्डविच, साबुदाणा वडा, गरम चहा, कॉफीचा स्वाद चाखायला मिळणार आहे. नव्या डायनिंग कारच्या उपाहारगृहात एका वेळी ४० प्रवाशांची बसण्याची व्यवस्था असणार आहे.

नव्या डेक्कन क्वीनचा विनाईल डिझाईनवर काही रेल फॅननी नाराजी व्यक्त केली होती. जर विनाईल स्टीकर डिझाईनची रंगसंगती आवडली नसली तर ती बदलणे इतके अवघड नाही.

इंटरेरिअर डिझायनरद्वारे पुण्यात प्रसिद्ध असणाऱ्या मराठी संस्कृतीचा प्रभाव त्यावर दिसायला हवा होता. उदा. पैठणीच्या रंगाचा पॅटर्न द्यायला वाव होता असे सूत्रांनी स्पष्ट केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा