गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची प्रवाशी संघटनांची मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील ३ महिने बंद असलेली रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्यात आली. परंतु, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच याचा लाभ मिळत आहे. दरम्यान आता गणेशोत्सव अवघ्या १ महिन्यावर आला आहे. त्यामुळं गावी जाण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू झाली आहे. यामुळं परराज्यात जाणाऱ्या कामगारांसाठी मोफत रेल्वेगाड्या सोडणाऱ्या सरकारने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठीही विशेष रेल्वेगाडी सोडण्याची मागणी मुंबई, ठाण्यातील कोकण प्रवासी संघटनांनी करत व्हॉट्सअ‍ॅप मोहीम सुरू केली आहे. 

काळ्या रंगाचे कपडे परिधान करून, नाव, पत्ता इत्यादी माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्याचे आवाहन संघटनांनी केले आहे. ही सर्व माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका आठवड्यानंतर पाठवण्यात येणार आहे. कोरोनामुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. 

एसटी सोडल्यास त्या प्रासंगिक करारावर चौपट भाडे आकारून नको, तर मूळ भाडे आकारून एसटी सोडण्याची मागणी आहे. 

काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले छायाचित्र, पूर्ण नाव, सध्या राहण्याचे ठिकाण, तालुका लिहून संघटनेच्या ७०२१९१६१५१ किं वा ०८९७६०२०७९३ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन केल्याचे कांबळे म्हणाले. वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव यशवंत जडय़ार यांनी आठवडाभर ही मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगितले.

सध्यस्थीतीत कोकणासाठी एसटी किंवा रेल्वे सोडण्याबाबत आणि त्याच्या नियोजनाविषयी काहीच माहिती शासनाने दिलेली नाही. कोकणातील काही गावांतील ग्रामपंचायतींकडून गणेशोत्सवानिमित्त गावात आल्यास १४ दिवस अलगीकरणात राहण्याचा नियम चाकरमान्यांसाठी आखण्यात आला आहे. त्यामुळे आणखीनच पंचाईत झाली आहे.


हेही वाचा - 

मुंबई कोरोनाचे ९९५ नवे रुग्ण, दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू

मुंबई महापालिकेला दुसरा धक्का, आरोग्य समितीच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण


पुढील बातमी
इतर बातम्या