येत्या काळात सर्वानाच लोकल प्रवासाची परवानगी मिळणार?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक व लसीकरण पुर्ण झालेल्या प्रवाशांनाच लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता सरसकट सर्वांनाच लोकल प्रवासाची परवानगी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वानाच लोकल प्रवासाची परवानगी देण्यासंदर्भात राज्य सरकारच्या राज्य कार्यकारी समितीची बैठक येत्या शुक्रवारी होणार आहे. या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरसकट सर्वांनाच लोकल प्रवासाची परवानगी देण्यात येणार अससल्याने मध्य व पश्चिम रेल्वेही सज्ज झाली आहे. यात सर्व तिकीट खिडक्या सुरू करण्याबरोबरच एटीव्हीएमची संख्याही वाढवली जात असल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वेवर १७८ एटीव्हीएम सुरू करण्यात आली असून रेल्वेच्या मदतनीसांमार्फत सेवा दिली जात असल्याचं समजतं.

लोकलची प्रवासी संख्या वाढल्यानं मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं फेऱ्यांमध्ये वाढ केली. मध्य रेल्वेवर दररोज १,८१० आणि पश्चिम १,३७६ फेऱ्या होत आहेत. त्यानुसार तिकीट खिडक्यांमध्ये काहीशी वाढ करतानाच मोबाइल तिकीटही सुरू केले.

शिवाय, दोन्ही रेल्वे मार्गावरील स्थानकांत मदतनीसांमार्फत मोजक्याच स्थानकात स्मार्ट कार्डमार्फत तिकीट मिळणारे एटीव्हीएमही सुरू केले. सर्वानाच लोकल प्रवासाची परवानगी देण्याची तयारी सुरू असल्याने मध्य रेल्वेने एटीव्हीएमची संख्या वाढवण्यास सुरुवात केल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या