प्रवासी आरक्षण केंद्र 2 ऑगस्टला तात्पुरते बंद

मुंबईकरांना 2 ऑगस्ट रोजी पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील तिकीट आरक्षण करण्यासाठी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. कारण गुरुवारी तिकीट आरक्षण केंद्र काही वेळासाठी बंद राहाणार आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्स (क्रिस) तर्फे प्रवासी आरक्षण यंत्रणा (पीआरएसी) यामध्ये बदल केले जाणार आहेत. त्यामुळे कम्प्युटराइज्ड तिकीट यंत्रणा (पीआरएसी) टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहे.

 

या वेळेत राहणार बंद

2 ऑगस्ट रोजी दुपारी 2.15 वाजता पासून 3 ऑगस्टच्या मध्य रात्री 1.20 पर्यंत पीआरएसला अद्ययावत करण्याची प्रक्रिया चालणार आहे. त्यासाठी हे आरक्षण केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.  गुरुवारी 2 ऑगस्टला दुपारी 2.15 वाजतापासून ते 3.15 वाजेपर्यंत पीआरएसी आणि इंटरनेट तिकीट बुकिंग बंद राहणार आहे. 

त्यांनतर दुपारी 3.15 ते रात्री 11.45 पर्यंत ही सेवा सुरू राहील. तर रात्री 11.45 वाजतापासून ते 1.20 वाजेपर्यंत पुन्हा ही सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. मध्यरात्री 1.20 वाजतापासून सर्व सेवा सुरू करण्यात येणार आहे. आप्तकालीन परिस्थितीतसुद्धा तिकीट आरक्षण सेवा योग्य पद्धतीनं चालावी यासाठी क्रिसकडून या यंत्रणेत काही बदल करून ती अधिक अद्ययावत केली जाणार आहे.


हेही वाचा -

मराठा क्रांती मोर्चाचा राज्यभर जेलभरो 

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न


पुढील बातमी
इतर बातम्या