मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न


मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न
SHARES

मंत्रालयासमोर आत्महत्या किंवा आत्महत्येचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. आता एका महिलेने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. राधाबाई साळुंखे असं या महिलेचं नाव आहे. राधाबाई यांनी मंत्रालयासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयाच्या सुरक्षा विभागाने वेळीच त्या महिलेला ताब्यात घेतल्यानं अनर्थ टळला.


आत्महत्येच्या प्रयत्नाचं कारण

जमिनीचा निकाल राधाबाई यांच्या विरोधात लागल्याने त्यांनी मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र मंत्रालयाच्या सुरक्षा विभागाने त्यांना वेळीच ताब्यात घेत मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात नेले. राधाबाई या बीडच्या रहिवासी आहेत. राधाबाई सध्या मरीन ड्राइव्ह पोलिसांच्या ताब्यात आहेत.


हेही वाचा -

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा