कल्याण-ठाकुर्लीदरम्यान रुळाला तडे, मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं

  • मुंबई लाइव्ह टीम & अतुल चव्हाण
  • परिवहन

कल्याण-ठाकुर्ली स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे मध्य रेल्वेच्या कल्याण ते सीएसएमटी मार्गावरील वाहतूक जवळपास एक तास विस्कळीत झाली होती. तासाभरानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून रुळाची दुरुस्ती करण्यात आली. या कालावधीत त्या मार्गावरील सर्व गाड्या दुसऱ्या मार्गावरुन वळवण्यात आल्या. यामुळे अाठवड्याच्या पहिल्याच दिवशीच मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

४ दिवसातील दुसरी घटना

कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या ट्रॅकवर अचानक बिघाड झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपासले असता रुऴाला तडा गेल्याचं अाढळून आलं. त्यानंतर लगेच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची गेल्या ४ दिवसातील ही दुसरी घटना आहे. शनिवारी मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे बंद पडली होती.


हेही वाचा -

बुलेट ट्रेनची नाही तर सुरक्षित रेल्वेची खरी गरज - मेट्रोमॅन ई श्रीधरन

हॉटेलमध्येच ‘चेक इन’ची सुविधा, मुंबई विमानतळाचा उपक्रम


 

पुढील बातमी
इतर बातम्या