Advertisement

हॉटेलमध्येच ‘चेक इन’ची सुविधा, मुंबई विमानतळाचा उपक्रम


हॉटेलमध्येच ‘चेक इन’ची सुविधा, मुंबई विमानतळाचा उपक्रम
SHARES

विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशावेळी विमानतळावर चेक इनसाठी प्रवाशांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागतं. मात्र यापुढे प्रवाशांना चेक इनसाठी विमानतळावर रांगेत उभं राहण्याची गरज भासणार नाही. कारण
मुंबईतील सहा फाईव्ह स्टार हॉटेलमधून ‘चेक इन’ करणं प्रवाशांना शक्य होणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळानं हा उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे.


या हॉटेल्समध्ये ही सुविधा

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळानं पुरवलेल्या या अत्याधुनिक सुविधेमुळे प्रवाशांना विमानतळावर सामानासह रांगेत उभं राहाण्याची गरज भासणार नाही. सध्या ही सुविधा सहारा स्टार, हयात रिजन्सी, ताज सांताक्रुझ, आयटीसी मराठा, हिल्टन मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि द ललित या सहा हॉटेलमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

काही काळानंतर त्यामध्ये आणखी पाच हॉटेल्सचादेखील समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड या कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली.


संपूर्ण प्रक्रिया

यापैकी तीन हॉटेल विमानतळाच्या जवळच आहेत. टर्मिनल १ द्वारे सेवा देणाऱ्या सर्व विमान कंपन्यांकडे सेल्फ-बॅग ड्रॉप (एसबीडी) सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेद्वारे बोर्डिंग पास आणि बॅगेला टॅग लावून मिळेल. त्यानंतर विमानतळावर फास्ट बॅग ड्रॉप काउंटरवर जाऊन सुरक्षा तपासणी केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा