दिव्यांगांनी 'जायचं' कुठे? मध्य रेल्वेच्या २२ स्थानकांवर शौचालयांची वानवा!

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

मुंबईतील मध्य रेल्वेच्या २२ रेल्वे स्थानकांवर अपंग प्रवाशांसाठी शौचालयच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. भारतीय रेल विभागाला सर्वात जास्त महसूल हा मध्य रेल्वेकडून उपलब्ध होतो. तरीही, २२ रेल्वे स्थानकांवर अपंगांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दिव्यांगांनी शौचालयासाठी अाता 'जायचं कुठे'? हा प्रश्न पडला अाहे. माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मध्य रेल्वेकडूनच ही माहिती देण्यात आली आहे.

'ही' अाहे धक्कादायक माहिती...

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मध्य रेल्वेच्या कोणत्या रेल्वे स्थाकांनवर महिला आणि दिव्यांग प्रवाशांसाठी शौचालये आहेत, याबाबत मध्य रेल्वे कार्यालयकडून माहिती मागवली होती. त्यानुसार मध्य रेल्वेचे जनमाहिती अधिकरी यांनी शकील अहमद शेख यांनी सांगितलं की, यात मध्य रेल्वेच्या तब्बल ७६ स्थानकांपैकी २२ रेल्वे स्थाकांनवर दिव्यांग प्रवाशांसाठी शौचालये नाहीत.

'या' स्थानकांचा समावेश

मध्य रेल्वेच्या चिंचपोकळी, करी रोड, नाहूर, पलासधारी, केळावली, डोलावली, लोवजी, वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूडस दरावे, बेलापूर, खारघर, मानसरोवर, खान्डेश्वर, रबाळे या स्थानकांवर सुविधांची वानवा आहे. तसंच आटगांव रेल्वे स्थाकांनवर महिलांसाठी आतापर्यंत शौचालय बांधण्यात अालेलं नाही.

रेल्वेमंत्र्यांशी पत्रव्यवहार

शकील अहमद शेख यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून या रेल्वे स्थानकांवर महिला आणि दिव्यांग प्रवाशांसाठी शौचालय बांधून देण्याची मागणी केली आहे.


हेही वाचा -

सार्वजनिक शौचालयाच्या देखभालीची कळ खासगी एजन्सी सोसणार

पुढील बातमी
इतर बातम्या