Advertisement

सार्वजनिक शौचालयाच्या देखभालीची कळ खासगी एजन्सी सोसणार


सार्वजनिक शौचालयाच्या देखभालीची कळ खासगी एजन्सी सोसणार
SHARES

मुंबईतील सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी आता खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात येणार आहे. ही एजन्सी जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रसाधनगृहाच्या देखभालीचा खर्च भागवणार असून या प्रसाधनगृहांचा वापर करणाऱ्यांकडून यापुढे कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाहीत.


'अशा' प्रकारची उभारणी

यासाठी महापालिकेने १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीतून नवीन शौचालये बांधण्यात येणार आहेत. मुंबईत आतापर्यंत वस्ती स्वच्छता कार्यक्रम लॉट १० अंतर्गत सामुदायिक प्रसाधनगृहांमध्ये ३२०० शौचकुपे आणि पैसे द्या व वापरा योजनेतंर्गत ७५० शौचकुपे निर्माण केली आहेत. तर पुढील ३ वर्षात २० हजार शौचकुपे बांधण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


किनाऱ्यांची सफाई यांत्रिकी पद्धतीने

मुंबईत समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता यांत्रिकी झाडूने केली जाते. परंतु यापुढे जुहू तसंच वर्सोवा समुद किनाऱ्यावरील कचरा सफाईकरीता पावसाळ्यात अतिरिक्त मनुष्यबळ व मशिन वापरण्याची अट घालून कंत्राटे दिली जाणार आहेत.

पुढील ३ वर्षांकरता घरोघरी ओला व सुका कचऱ्यासाठी १० लिटर क्षमतेच्या १२ लाख कचऱ्याच्या डब्याची खरेदी केली जाणार आहे. याशिवाय पुढील २ वर्षांकरीता १२० व १४० लिटर क्षमतेच्या सुमारे ६० हजार कचऱ्याचे डब्यांची खरेदी करण्यात येणार आहे.


देवनारमधील उर्जा निर्मिती प्रकल्प

महापालिकेनं देवनार येथे कचऱ्यापासून उर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याची योजना हाती घेतली आहे. त्यामुळे सुरूवातीला ६०० मेट्रीक टन प्रतिदिन क्षमतेच्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प देवनार येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या निविदेचं काम अंतिम टप्प्यात असून पुढील वर्षी प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे. यासाठी ११० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा