पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकात रेल्वे उड्डाणपूल उभारण्यासाठी आज, बुधवारी सकाळी ८.४० ते १०.४० दरम्यान विशेष ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत पुलासाठी पाच गर्डर उभारण्यात येणार आहेत. यामुळे दुपारी १२ वाजता धावणारी विरार-चर्चगेट लोकल आणि बोईसर-वसई रोड मेमू रद्द करण्यात येणार आहे.
ब्लॉक कालावधीत धावणाऱ्या डहाणू रोड-चर्चगेट आणि चर्चगेट-डहाणू रोड या लोकल फेऱ्या केळवे स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक १९००२ सुरत-विरार एक्स्प्रेस पालघर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे. (१२९३४) अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेस, (१२४७९) जोधपूर-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस, (२२९५६) भुज-वांद्रे टर्मिनस आणि इंदूर-कोचुवेली एक्स्प्रेस या चार रेल्वेगाड्या ३० मिनिटांपासून ते सव्वा तासांपर्यंत विविध स्थानकांत थांबविण्यात येणार आहेत.
हेही वाचा