Advertisement

'या' रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

तुम्हाला नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर जाता येणार नाही.

'या' रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद
SHARES

मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार, आता तुम्हाला पुढील काही दिवस संध्याकाळच्या वेळेत प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही. परिणामी तुम्हाला नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर जाता येणार नाही.

मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई विभागातील सीएसएमटी, एलटीटी, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल येथे सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. हे निर्बंध १५ जुलैपर्यंत लागू राहणार आहेत. 

एक्स्प्रेसमधून जाणाऱ्या प्रवाशांना स्थानकावर सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी फलाट तिकीट काढावे लागते. तसेच फलाटावर काही काळ थांबण्यासाठी अनेक जण फलाट तिकीट घेतात. त्यामुळे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढते. परिणामी, इतर प्रवाशांना इच्छित फलाटावर, रेल्वेगाडीत पोहचण्यास विलंब होतो.

प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी आणि दादर येथे सायंकाळी ६ ते रात्री १२.३०, ठाणे येथे सायंकाळी ७ ते रात्री १.३०, कल्याण येथे सायंकाळी ६ ते रात्री १.३०, एलटीटी येथे सायंकाळी ६.३० ते रात्री १ आणि पनवेल येथे रात्री ११ ते रात्री २ वाजेपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद ठेवण्यात येणार आहे.

या निर्बंधामधून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, लहान मुलांसोबत येणाऱ्या महिला प्रवाशांना सूट देण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा