खासगी वाहतूकदार लूटताहेत? मग इथं फोन करा!

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • परिवहन

उन्हाळा असो की गणपती, दिवाळी वा नाताळ्याच्या सुटट्या लागल्या की खासगी वाहतूकदार तिकीटदर अव्वाच्या सव्वा वाढवून प्रवाशांची आर्थिक लूट करतात. या आर्थिक लुटीला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने २७ एप्रिलपासून चाप लावला आहे. एसटीच्या भाड्याच्या केवळ दीडपट इतकंच भाडं खासगी वाहतूकदारांना आता आकारता येईल. तसा अध्यादेशच सरकारने जारी करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

परिवहनने दिला पर्याय

या अध्यादेशानुसार जे खासगी वाहतूकदार या नियमांचं पालन करणार नाही, प्रवाशांची आर्थिक लूट करतच राहतील, अशा प्रवाशांना थेट परिवहन मंडळाकडे तक्रार करता येणार आहे. प्रवाशांना तक्रार नोंदवता यावी यासाठी परिवहन मंडळानं टोल फ्री नंबरसह ई-मेल आयडी जारी केला आहे. या ई-मेल आयडी आणि टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधत प्रवाशांना लुबाडणाऱ्या वाहतूकदारांची तक्रार नोंदवता येईल.

'या' नंबरवर करता येईल तक्रार

प्रवाशांना १८००२२०११० आणि ०२२-६२४२६६६६ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात. तर www.transortcomplaint.mahaonline.gov.in या ई-मेल आयडीवरही तक्रार करू शकतात. या तक्रारींची तात्काळ दखल घेत अशा वाहतूकदाराविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. चौकशीत वाहतूकदार दोषी आढळल्यास त्याचा परवाना देखील रद्द करण्यात येईल.


हेही वाचा-

खासगी वाहतूकदारांना दणका! एसटीच्या दीडपटच भाडं आकारता येणार

सुट्टीसाठी बाहेर पडलेले मुंबईकर वाहतूक कोंडीत अडकले!


पुढील बातमी
इतर बातम्या